ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशातील कोरोना संक्रमणस्थिती गेल्या काही महिन्यांपासुन समाधानकारक भासत असली तरी सद्या दक्षिण आफ्रिका या देशाचा विचार केल्यास सद्याची कोरोनास्थिती ही केंद्र आणि राज्य सरकारच्या चिंतेत भर टाकणारी आहे. कारण तज्ज्ञांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार फाइजर-बायोटेक कोरोना लसच्या दोन्ही लस घेतल्याच्या 90 दिवसानंतर कोरोना संक्रमणाची शक्यता वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रिटिश मेडिकल जर्नल द्वारा प्रकाशित एका अहवालानुसार फाइजर-बायोटेक कोरोना लसीच्या दोन लस घेऊन ही कोरोना संक्रमणाचा धोका हळुहळु वाढू शकतो. असे अहवालात म्हटले आहे.
तसेच लसी घेतल्यानंतर 90 दिवसानंतर ही कोरोनाचा धोका वाढत जात असल्याचे ही या अहवालातुन स्पष्ट झाले आहे. हे अध्ययन इस्त्राईल येथील लेउमिट हेल्थ सर्विसेसद्वारा केले गेले आहे. बायोटेक वैक्सीनचे लसीकरण झाल्यानंतर सुरुवातीच्या काही आठवड्यात आवश्यक त्या प्रमाणात प्रतिकारक्षमता तयार होते. मात्र यानंतर सातत्याने मानवी शरीरातील प्रतिकारक्षमता कमी – कमी होत असल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
जगभर चालवलेल्या मोठ्या लसीकरण मोहिमांमुळे विषाणूचा प्रसार रोखण्यात मदत झाली यात शंका नाही. परंतु ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण इतर देशांपेक्षा जास्त आहे. अशा देशांमध्ये पुन्हा एकदा ही साथीची साथ पसरत आहे, त्यामुळे ही लस किती काळ प्रभावी राहते याचा विचार करण्यास शास्त्रज्ञांना भाग पाडले आहे. आतापर्यंत जगभरात २६ कोटींहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये ५२ लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर २३५ कोटी रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. दुसरीकडे, भारताशी संबंधित आकडेवारीवर नजर टाकल्यास, देशात आतापर्यंत कोरोनाचे ३.४६ कोटी रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४६७,४६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३३९,७७,८३० रुग्ण बरे झाले आहेत.