प्रतिनिधी / फलटण :
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय मराठी साहित्य संमेलन 21 व 22 मार्च रोजी फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात होणार आहे. साहित्यिक व निवेदक सुधीर गाडगीळ हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले व कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
नियोजित 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व ज्येष्ठ कथाकार भारत सासणे व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव प्रसिद्ध कवियत्री व चित्रकार मीनाक्षी पाटील संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.









