प्रतिनिधी/ फलटण
फलटण नगरीला विविध खेळाची परंपरा आहे याला खो -खो खेळही अपवाद नाही
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन सर्व प्रकारच्या मैदानी खेळ विकसीत व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असुन आम्ही त्यासाठी शासन व शासनाचा क्रिडा विभाग यांचेशी सतत पाठपुरावा करीत असतो फलटणमधील सध्या सुरू होत असणाया राष्ट्रीय शालेय खो -खो खेळा तील खेळांडुना शुभेच्छा देत असल्याचे सांगत खेळाडुंनी आपल्या देशासाठी खेळावे व देशाचे नांव उज्वल करावे असे आवाहन सातारा जिल्हा चे पालकमंत्री ना . बाळासाहेब पाटील यांनी केले
फलटण येथील घडसोली मैदानावर राष्ट्रीय शालेय खो -खो स्पर्धाच्या उद्घाटन शुभारंभाप्रसंगी ना . पाटील बोलत होते
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , आ . दिपक चव्हाण महाराष्ट्र खो -खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे , कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्रीमंत रघुनाथ राजे ’ श्रीमंत सुभद्रा राजे , श्रीमंत विश्वजीत राजे , श्रीमंत सत्यजित राजे डी .के. पवार सुभाषराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते
अध्यक्षीय भाषणात श्रीमंत रामराजे म्हणाले ज्याप्रमाणे कबड्डी खेळाला एशिया खेळ म्हणुन मान्यता मिळाली त्याप्रमाणे खो -खो खेळाला एशिया खेळ म्हणुन मान्यता मिळावी असा प्रयत्न आपण फार सुरुवातीपासुन करीत आहे
महाराष्ट्रीतील सर्व खेळांना आर्थिक सहाय्य मिळावे , खेळाला उत्तम दर्जा प्राप्त 0हावा , लोकप्रियता मिळावी , यासाठी आम्ही शरद पवार यांचेकडे नेहमी आग्रह धरत असतो त्याला पहिल्यापासुन शरद पवार अजित पवार यांनी साथ दिली असल्याचे सांगत राष्ट्रीय खो -खो स्पर्धांचा मान यावेळी फलटणला मिळाल्याने देशाच्या विविध राज्यातुन मुलां मुलीचे संघ फलटणमध्ये दाखल झाले आहेत या सर्व खेळांडुंचे आपण मनापासुन फलटण नगरीत स्वागत करून रामराजे यांनी सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी विविध खो -खो संघातील खेळांडुंनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे नेत्रदिपक कार्यक्रम सादर केले
: आभार प्रदर्शन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गदहर्निंग कौन्सील सदस्य शिवाजीराव घोरपडे यांनी केले
या कार्यक्रमास शहर व तालुक्यातील सर्व क्रिडाप्रेमी . विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे सह
.प्रांतांधिकारी, . तहसिलदार, फलटण, मा.श्री. काटकर, मुख्याधिकारी, फलटण नगरपरिषद, फलटण, मा.श्रीमंत रघूनाथराजे नाईक-निंबाळकर, चेअरमन, फलटण एज्युकेशन सोसा., मा.डॉ.श्री. जयप्रकाश दुबळे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, म.रा.पुणे, मा.डॉ.श्री. माणिक ठोसरे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, मा.श्री. क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (माध्य.)जि.प.सातारा, मा. सौ. रेखाताई खरात, उपसभापती, फलटण पंचायत समिती, फलटण, मा.श्रीमंत विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, सदस्य, फलटण पंचायत समिती, फलटण, मा.रेश्माताई भोसले, माजी सभापती, फलटण पंचायत समिती, फलटण, मा.श्रीमंत सत्यजितराजे नाईक-निंबाळकर हे उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असो. यांनी करुन, स्पर्धेकरिता सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाने पत्रकार, विविध खेळाडू, क्रीडाप्रेमी, नागरीक उपस्थित होते
सदर क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक यांची निवास व्यवस्था मुधोजी कॉलेज गर्ल्स होस्टेल, फलटण, श्रीमंत मालोजीराजे विद्यार्थी वसतिगृह, फलटण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्या. फलटण, मालोजीराजे शेती शाळा गेस्ट हाऊस या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच भोजन व्यवस्था मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, फलटण येथे करण्यात आलेली आहे. सदर क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त संघांना ट्रॉफी, मेडल फलटण एज्युकेशन सोसा.फलटण यांच्यामार्फत देण्यात येणार आहेत; व सामने दिवस-रात्र सत्रात होणार असल्याने प्रकाशझोताची प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेकरिता गॅलरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरी सदर क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंची प्रोत्साहन वाढविण्यासाठी खेळाडू, नागरिक, क्रीडाप्रेमी यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे; असे आवाहन श्री. युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी,सातारा यांनी केलेले आहे.









