फलटण / प्रतिनिधी :
फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच युवक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकार हटाव आंदोलन आज सकाळी 11 वाजता येथील नामजोशी पेट्रोल पंप आवारात करण्यात आले.
भाजपप्रणित केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार चलेजाव .. ची घोषणाबाजी करण्यात आली. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी (बेडके), तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अमीर भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे, फलटण ग्रामीणचे उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, सातारा जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे अनुसूचित जाती जमातीसेलचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ दैठणकर, शहर अध्यक्ष मोहित बारशी कर अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष ताजुभाई बागवान, शहर अध्यक्ष अलताब पठाण यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या सात वर्षात या सरकारला कोणतेही यश मिळाले नाही. देश विकासाच्या नियोजनात मोदी साकार पुर्णतः फसलेले सरकार आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र स्पष्ट झाले असुन, मोदी सरकारला राज्यकारभार करण्याचा काडीमात्र अधिकार राहिला नाही. एकूण सरकारच्या कारभार पध्दती निषेधार्ह असल्याचे काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले आहे