फलटण / प्रतिनिधी :
फलटण शहरातील कुरेशीनगर, मंगळवार पेठ येथे शहर पोलिसांनी छापा टाकून दीड टन गोमांस आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण 9 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 03 मे रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर, मंगळवार पेठ फलटण येथे इरफान याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांचे पाच साथीदार यांनी बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केली होती. यामध्ये 1500 किलो गोमांस व कत्तल करण्यासाठी आणलेली जिवंत जनावरे व गोमांस वाहतूक करण्यासाठी वापरलेली महिंद्रा पिकप, मारुती 800 व एक मोटरसायकल असा एकूण 9,10,000/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.