फलटण आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर
ऑनलाईन टीम / सातारा :
फलटमध्ये 20 वर्षीय तरुण जिंवत असताना त्याला कोरोनामुळे मृत घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर फलटण आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला.
सिद्धांत मिलिंद भोसले (वय 20) असे या युवकाचे नाव आहे. तो मंगळवार पेठ, फलटण येथील रहिवाशी आहे. मे महिन्यात त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. खासगी रुग्णालयात उपचार घेऊन तो बराही झाला. मात्र, आरोग्य विभागाने 7 जूनला सिद्धांतचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या आईला फोनवरुन दिली. त्यावेळी सिद्धांच्या कुटुंबियांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.









