प्रतिनिधी / फलटण :
स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसीचे आरक्षण स्थगीत केल्याच्या पार्श्वभुमीवर फलटण तालुका ओबीसी जनमोर्चाच्या वतीने आज ( दि14 ) सकाळी 11.00 वा येथील तहासिल कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. ओबीसी जनमोर्चाच्या वतीने तहसिलदार समीर यादव यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्थेतील सुप्रिम कोर्टाने स्थगित केलेले आरक्षण पुर्ववत करावे, राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडुन इंम्पिरीकल डाटा गोळा करून तो डाटा सुप्रिम कोर्टात सादर करावा, केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय
जणगणना करावी, राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला 500 कोटींचा निधी तात्काळा उपलब्ध करून दयावा, आदी मागण्या नमुद करण्यात आल्या आहेत सदर मागण्यांचे निवेदन तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे
फलटण तालुका ओबीसीजन मोर्चात ओबीसी प्रवर्गातील विविध जातींचे प्रमुख घटक, तालुका व शहरातील विविध संस्थाचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील लोक मोठया संख्येने सहभागी झाले होते.









