प्रतिनिधी /वास्को
‘फर्स्टक्राय डॉट कॉम’ या बेबी आणि किडस् उत्पादाच्या सर्वात मोठा संग्रह स्टोअरचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते सार्थक गार्डन, फार्मागुडी हायवे, बायपास रोड फोंडा येथे नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खाते, कायदा व न्याय व्यवस्था मंत्री निलेश काब्राल, कृषी, हस्तकला व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रवी नाईक, वीज व गृहनिर्माण खात्याचे मंत्री रामकृष्ण ढवळीकर, फर्स्ट क्रायचे व्यवस्थापक मुजम्मिल अवती व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, कपडय़ांच्या कंपन्या गोव्य़ात येत आहे. त्यांना उत्तेजन देण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण या कंपन्यामुळे नोकरी व्यवसायांना चालना मिळेल. तसेच अशा कंपन्यांना अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. या स्टोअरमध्ये बेबी आणि किडस् उत्पादनांचा सर्वात मोठा संग्रह आहे. त्याचा लाभ फोंडा व इतर भागातील ग्राहकांनी उठवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री निलेश काब्राल, मंत्री रवी नाईक यांचीही समयोचित भाषणे झाली.
सुरवातीला मुख्यमंत्र्यांच्याहस्sत फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून फर्स्टक्राय डॉट कॉमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत समीर किनळकर यांनी केले तर सुजया किनळेकर यांनी आभार मानले.









