बेळगाव /प्रतिनिधी
ग्राहकांसाठी खास आकर्षण असणारी ऑफर सध्या कॉलेज रोड येथील महात्मा गांधी भवन येथे फर्निचर फेअर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. या फर्निचर फेअर प्रदर्शनात विविध आकारातील सोफासेट, नानाविध प्रकारचे डायनिंग टेबल, आराम खुर्च्या, झाडाच्या बुंध्यातून हुबेहूब वाटणारे नचरल टेबल, ट्री ट्रॉली, लाकूड व मार्बल डायनिंग प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनात दिल्ली, मुंबई, केरळ यासह संपूर्ण भारतातील वेगवेगळय़ा ठिकाणांहून फर्निचरच्या व्हरायटी पाहायला मिळत आहेत.
तसेच या प्रदर्शनात ब्राझील, रशिया, मॉरीसिअस, मेक्सिको, फ्रान्स, नामिबिया येथील रंगीबेरंगी खडक असून अत्याधुनिक उपकरणांची मांडणी करण्यात आली आहे. याशिवाय घराच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात येणारे वेगवेगळे शो पीस या प्रदर्शनाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. दि. 9 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10.30 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. शनिवार व रविवार सुटीचा दिवस असल्याने हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. तसेच गेल्या चार दिवसांत प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आज शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.









