पुसेगाव / वार्ताहर :
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या फरार आरोपीस पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले. रोहन सूर्यकांत मसणे असे या आरोपीचे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी २०२१ रोजी रोहन याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला, या बाबत पुसेगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र , तेव्हापासून फरार असलेला रोहन मसणे पुसेगावात येणार असल्याची माहिती सपोनि चेतन मछले यांना मिळली. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मछले यांनी शोध पथक तयार करून सापळा लावला. पोलिसांचा संशय आल्याने रोहन याने कोरेगाव बाजूस मोटारसायकलवरून पलायन केले. पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, सहाय्यक फौजदर जगताप,कर्मचारी सचिन माने, के के कुंभार, पुष्कर जाधव, सचिन जगताप यांनी रोहनचा पाठलाग करून त्याला क्षेत्रमाहुली येथे ताब्यात घेतले. अधिक तपास पीएसआय लोंढे करत आहेत.