प्रतिनिधी/मुंबई
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या देखील सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी दिल्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.
याचबराेबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत देखील कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.