पुणे \ ऑनलाईन टीम
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात झालेल्या गोंधळाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बोलताना आमच्या सदस्यांकडून कोणतही गैरवर्तन झालं नसल्याचं आतापर्यंतच्या अनुभावाच्या आधारे सांगतो, असं म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी विचारलं असता फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही, असं म्हटलं आहे.
भास्कर जाधव यांनी काय काय आणलं हे त्यांनी रेकॉर्डवर आणलं आहे. त्यांनी दालनातील गोष्टीही सांगितल्या आहेत. एका सदस्याने माईक खेचला एकाने राजदंड पळवला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की, अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात यावी. आम्ही मागील राजकीय कारकिर्दीत अनेक गोंधळ पाहिले आहेत. आमचेही सदस्य निलंबित करण्यात आले होते तेव्हा हल्लाबोल आंदोलनही केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सगळं सांगितले आहे. यामुळे फडणवीसांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील मृत्यूदर कमी झाले आहे परंतु लोकांनी मास्क वापरण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील जनतेला आणि पुण्यातील लोकांना आवाहन आहे की, कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करा, काही लोकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आणि मास्क लावण्यास टाळाटाळ केली. यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही लोकांचा दुर्दैवाने कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, दोन्ही लसीचे डोस घेतले तरी मास्क, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे.
पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे. पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांवर आला आहे. तर पिंपरी चिंचवडचा ५ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. पुण्यात सध्या सुरु असलेले निर्बंध कायम ठेवण्यात येत आहेत. पुण्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. दुकानं बंद होत आहेत परंतु हातगाड्या सुरु राहत आहेत. यामुळे ४ नंतर हे सगळं बंद झाले पाहिजे. पर्यटनाची ठिकाणं सिंहगड, लोणावळा येथे गर्दी होऊन कोरोना वाढत असल्यामुळे कोरोना निर्बंधांची कडक अमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आणि सीपी यांना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच पर्यटकांकडून दंड आकारण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Previous Articleआशांवर ॲन्टीजन टेस्टचा दबाव
Next Article वाई तालुक्यातील एका सावकाराकडून महिलेवर अत्याचार?








