बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आरोग्य विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सूचनेच्या आधारे या दीपावली दरम्यान फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यात फटाके बंदी असेल आणि लवकरच या संदर्भात आदेश जरी केले जातील असे शुक्रवारी म्हंटले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा दाखला देत आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी यावर्षी साध्या पद्धतीने दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्रीसुधाकर यांनी फटाके जाळल्यानंतर होणाऱ्या धुरामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, विशेषत: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्यावर पुन्हा विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. याविषयी आरोग्य विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीने या संदर्भात अहवाल सादर केला होता. मुख्यमंत्र्यांनी अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. यावर्षी आम्ही साध्या पद्धतीने दीपावली साजरी करावी आणि अर्थपूर्ण मार्गाने अधिक दिवे लावून आपली परंपरा पुढे चालू ठेवावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.









