‘एनजीटी’चे निर्देश : दिल्ली-एनसीआरमध्ये पूर्णपणे मनाई : वेळनिश्चितीचा अधिकार राज्यांना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिवाळीच्या दिवशी प्रदूषण पातळी कमी असलेल्या ठिकाणी ग्रीन फटाके फोडायला हरकत नसल्याचे म्हटले आहे. दिल्ली- एनसीआरमध्ये मात्र 9 ते 30 नोव्हेंबरपर्यंत फटाके फोडण्यावर प्रतिबंध आणले आहेत. तसेच बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याचे आदेश वरि÷ अधिकाऱयांना दिले आहेत. ‘एनजीटी’ने दिलेल्या निर्देशानुसार, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रदूषण पातळी कमी असलेल्या शहरे-राज्यांमध्ये दिवाळीदिवशी केवळ दोन तास फटाके फोडण्यास मुभा देण्यात आली आहे. सदर दोन तासाची वेळ आणि ठिकाणे निश्चित करण्याची जबाबदारी ‘एनजीटी’ने राज्यांवर टाकली आहे.
प्रदूषण टाळण्यासाठी दिल्लीसह राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांनीही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची घोषणा केली आहे. दिवाळी सणामध्ये मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होत असल्याने प्रदुषणाची पातळी वाढत असते. त्यातच यंदा प्रदूषण वाढल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात असल्याने मागील आठवडय़ातच काही राज्यांनी फटाकेबंदीची घोषणा जारी केली आहे.
फटाके व्यापारी-कारखानदार अडचणीत
अनेक राज्यांमध्ये दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातल्यामुळे फटाके कारखानदार आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. तामिळनाडूमधील शिवाकाशीमध्ये याबाबत अधिक नाराजीचे वातावरण आहे. कारण देशात विकल्या जाणाऱया फटाक्मयांपैकी 80 टक्के फटाके येथेच तयार केले जातात. फटाक्मयांच्या या व्यवसायातून सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळतो. ऑल इंडिया फायरवर्कर्स असोशिएशनच्या माहितीनुसार शिवकाशी येथे 1,070 कंपन्यांची नोंद असून एकटय़ा शिवकाशीत मागील वषी 6 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता. संपूर्ण देशाच फटाक्मयाच्या व्यवसायाची उलाढाल 9 हजार कोटी इतकी आहे. शिवकाशीमध्ये या व्यवसायात 3 लाख लोक अवलंबित आहेत. तर एकूण 5 लाख लोकांना यातून रोजगार मिळतो.









