सणासुदीच्या काळात विविध ई-कॉमर्स साईट्सवर खरेदी महोत्सवांचं आयोजन होतं. या महोत्सवांमध्ये स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची संधी मिळते. सवलती, ऑफर्स बघून ग्राहकही आकर्षित होतात. अमूक एका रकमेच्या खरेदीवर कॅशबॅक, डिस्काउंट अशाही ऑफर्स असतात. नो कॉस्ट ईएमआय असेल तर ग्राहकही महागडी वस्तू विकत घेण्याचा विचार करतात. यापैकी नो कॉस्ट ईएमआय म्हणजे नेमकं काय आणि यातून खरंच लाभ मिळतात का, हे जाणून घ्यायला हवं.
नो कॉस्ट ईएमआयला भुलून मागचा-पुढचा विचार न करता मोठी खरेदी केल्यास तुम्हाला वस्तूच्या किंमतीपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागू शकते. नो कॉस्ट ईएमआय ही खरेदी वाढवण्यासाठी केली जाणारी युक्ती असल्यामुळे अटी, नियम, शर्थी वाचल्याशिवाय खरेदी करू शकता. बँका ग्राहकांना दिलेली सवलत व्याज स्वरुपात वसूल करतात. नो कॉस्ट ईएमआय योजना तीन पद्धतींनी लागू होते. पहिल्या पद्धतीत ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी पूर्ण किंमत द्यावी लागते. कंपनी ग्राहकांना दिलेली सवलत बँकेला व्याज म्हणून देतात. दुसर्या प्रकारात कंपनी बँकेला द्याव्या लागणार्या व्याजाची रक्कम उत्पादनाच्या किंमतीत समाविष्ट करते तर तिसर्या पद्धतीत विक्री न झालेली उत्पादनं विकण्यासाठी नो कॉस्ट ईएमआय पर्यायाचा वापर केला जातो.
त्यामुळे नो कॉस्ट ईएमआयवर एखादी वस्तू खरेदी करण्याआधी त्या वस्तूची नेमकी किंमत इतर ई कॉमर्स साईट्सवर किंवा दुकानांमध्ये चौकशी करून जाणून घ्या. त्यानंतरच वस्तू विकत घ्या. अनेकदा दुकानांमध्येही वस्तू कमी किंमतीत मिळू शकते. ङ्गनो कॉस्ट ईएमआयफमध्ये काही शुल्कांचा समावेश असू शकतो. तुम्हाला या छुप्या खर्चांची माहिती असायला हवी.