ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभेच्या रिक्त जागांसाठी 30 ऑक्टोबरला मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली जादू कायम ठेवत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या.
दिनहाटा मतदारसंघातून उदयन गुहा 1 लाख 63 मतांनी, गोसाबातून सुब्रत मंडल 1 लाख 51 हजार मतांनी, शांतीपूरमधून ब्रजकिशोर गोस्वामी हे 63 हजारांहून अधिक मतांनी तर खर्डामधून शोभनदेव चट्टोपाध्याय विजयी झाले आहेत. या विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूलने भाजपचा दारूण पराभव केला आहे. या विजयासह विधानसभेत तृणमूलच्या आमदारांची संख्या 217 झाली आहे. तर, भाजपमधून आलेल्या आणखी पाच आमदारांचा समावेश केल्यास ही संख्या 222 वर पोहोचली आहे.