ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्घदेव भट्टाचार्य यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर घरातच उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बुद्घदेव भट्टाचार्य यांची ऑक्सिजनची लेव्हल 90 टक्क्यांपेक्षा खाली आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोलकाता मधील बुडलैंड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सध्या ‘यास चक्रीवादळा’चा धोका असल्याने डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी बुद्घदेव भट्टाचार्य यांची समजूत काढून रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नी मीरा भट्टाचार्य यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, बुद्घदेव भट्टाचार्य 2000 ते 2011 या काळात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या टीएमसीने राज्याचा कार्यभार स्वीकारला.









