बंडखोरीची चिन्हे : मंत्रिमंडळ बैठकीत 5 मंत्री गैरहजर
वृत्तसंस्था/ कोलकात
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे सहकारी नाराज असल्याचे वृत्त आहे. राज्याचे परिवहन मंत्री सुवेंदु अधिकारी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित राहिले आहे. अधिकारी मागील अनेक महिन्यांपासून पक्षापासून अंतर राखून आहेत. यादरम्यान त्यांनी पक्षाच्या बॅनरशिवायच अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. एकूण 5 मंत्री या बैठकीत सामील झाले नसल्याचे सांगण्यात येत.
सुवेंदु अधिकारी मंत्रिमंडळ बैठकीत सामील न होण्याचे कारण कुणालाच माहित नाही. अधिकारी यांच्याबरोबर शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनीही बैठकीत भाग घेतलेला नाही.
मंत्रिमंडळ बैठकीत अधिकारी, चटर्जी यांच्यासह राजीव बॅनर्जी, गौतम देव आणि रविंद्रनाथ घोष हे अनुपस्थित राहिले आहेत. परंतु 5 मंत्र्यांच्या एकत्रित अनुपस्थितीमुळे ममता सरकारमध्ये निवडणुकीपूर्वी असंतोष निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तर बंगालच्या दुर्गापूरमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते परस्परांनाच भिडले आहेत. दोन गटांमध्ये झालेल्या या संघर्षात एका कार्यकर्त्याचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.