वृत्तसंस्था / कैरो
जागितक व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रामध्ये पूर्ण सामना खेळणारे इजिप्तचे ग्रॅण्डफादर इझेलदिन बहादेर हे सर्वात वयस्कर फुटबॉलपटू ठरले आहेत. आपला 75 वा वाढदिवस काही दिवसांवर असताना बहादेर यांनी इजिप्तच्या थर्ड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात आपला सहभाग दर्शविला होता. बहादेर यांच्या या विश्वविक्रमाची नोंद ग्रिनिज विश्व विक्रम रेकॉर्डस्मध्ये झाली आहे.
इजिप्तचे माजी हौशी फुटबॉलपटू 3 नोव्हेंबर रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. शनिवारी त्यांच्या फुटबॉल संघाला इल अयात स्पोर्टस् क्लबकडून 2-3 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात बहादेर यांनी संपूर्ण 90 मिनिटे आपला सहभाग दर्शविला. जागतिक व्यावसायिक फुटबॉलमध्ये खेळण्याचा यापूर्वी इस्त्रायलच्या 73 वर्षीय हेइक यांचा विश्वविक्रम होता. पण बहादेर यांनी हेइक यांचा विश्वविक्रम मागे टाकला.









