जमखंडी
कोरोना नियंत्रणाकरिता सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये नगर पालिकेच्या कर्मचाऱयांनी धोका पत्करून योध्या प्रमाणे काम केले असून यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन प्रोत्साहधन म्हणून द्यावे अशी मागणी जमखंडी नगर पालिकेच्या कर्मचारी संघाने असि. कमिशनर डॉ. सिद्दू हुल्लोळ्ळी यांना निवेदनाद्वारे केली.
होम क्वॉरंटाईन सील डाऊन भागात विशेष जंतू नाशक औषध फवारणी, स्वच्छता बरोबर दूध पुरवठा करणे, फळ भाजीपाला, औषधे, किराणा, शुद्ध पाणी त्यांच्या मागणी प्रमाणे घरपोच पोचविण्याचे कार्य नगर पालिका कर्मचारी करीत आहेत. तरी यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार प्रोत्साहधन म्हणून द्यावा अशी मागणी नगर पालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप मोळे, उपाध्यक्ष गुरु मिशी, व्ही. एस. नंदी, अनिल हरिजन, ए. बी. नगाची, सदाशिव हणमगोळ्ळर, आय. एम. बोजगार, विनायक निडोणी, यल्लाप्पा मादर, मल्लप्पा मिशी, पुतळव्वा कडकोळ, रवी शिरगुप्पी, विजय बिळगी, श्रीशैल हावारी, व्ही. एच. घाटगे, विजयकुमार वंदाल, ए.डी. शेख, संजू नडुवीनमनी आदींनी केली.









