देश, परदेशातील साडेतीन हजार स्क्रिप्टमधून निवड; सरवडेच्या सुपुत्राचे कौतुकास्पद यश
सरवडे/प्रतिनिधी
सरवडे या. राधानगरी येथील सुपुत्र दिगंत संभाजी पाटील याने लिहलेल्या “गिल्ट “या संहितेला नुकतेच सिनेस्तन स्टोरीटेलर्स कॉन्टेस्ट मध्ये देशात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. १० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवून त्याने सरवडेसह जिल्ह्याचे नाव देशपातळीवर रोशन केले आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारत देशासह इतर देशातून साडेतीन हजार स्क्रिप्ट आल्या होत्या. त्यातून गिल्ट ला दुसऱ्या क्रमांकाचे यश प्राप्त झाले.
स्पर्धेचा निकाल CNN news18 या नॅशनल चॅनेलवरून जाहीर करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेता अमीर खान. जुही चतुर्वेदी. राजकुमार हिरानी. अंजुम राजाबली अशा मान्यवर कलाकारानी केले होते. तसेच संहिता प्रोड्युसरपर्यंत पोहचवन्यात लेखकांची मदत करणार आहेत. सद्या स्टार प्रवाह वर गाजत असलेली प्रेमाचा गेम सेम टू सेम या मालिकेचे संवाद लेखन करत आहे. तसेच एक इंग्रजी कादंबरी लिहली आहे. ती प्रकाशनच्या वाटेवर आहे.
ऑल इंडियन कुस्ती चॅम्पियनशिप विजेते व सुप्रसिद्ध गायक संगीतकार प्रा. संभाजी पाटील वडिलांकडून घरातच तबला वादनाचे धडे घेतले.सुरांचं वातावरनासोबत घरातील समृद्ध ग्रंथालयामुळे लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली त्याचा फायदा आत्ता होतो आहे असे त्याने सांगितले. प्रचंड कष्ट जिद्द चिकाटीने भौतिकशास्त्र मध्ये M.Sc करुन त्याने आयआयटी मुंबई येथे २ वर्ष संशोधन केले. सध्या तबल्यासोबत लेखना वर लक्ष केंद्रित करुन पटकथा लेखन सुरु केले आहे . त्याच्या ह्या उत्तुंग यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








