सागर पाटील / कळंबा
कळंबा तलाव परिसरात आज, शुक्रवारी पहाटे एका युवकाने प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार केला. छराच्या बंदुकीतून हा हल्ला केल्याची चर्चा कळंबा ग्रामस्थांमध्ये होती. यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून पोलिसांनी चौकशीसाठी संबंधित युवतीला त्वरित ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कसून चौकशी करत आहेत. तर गोळीबार करणाऱ्या त्या युवकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पण त्याने राहत्या घरातून पलायन केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोळीबार झाला की नाही या बाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र छराच्या बंदुकीतून हल्ला केल्याची चर्चा नागरिकांच्यात रंगली आहे.
Previous Articleअज्ञात वाहनांच्या धडकेत दोघे ठार
Next Article हरमल, मोरजी परिसरातील सात दिवशीय गणरायाला निरोप









