साधारणपणे गर्भावस्थेचा कालावधी 37 आठवडय़ांचा असतो. त्यापूर्वी मूल जन्माला आल्यास त्याला ‘प्री मॅच्युअर बेबी’ असे म्हटले जाते.
- वेळेपूर्वी जन्माला येणार्या मुलांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. बर्याचदा अशा मुलांना जन्मानंतर अनेक दिवस दवाखान्यात ठेवण्याची आवश्यकता असते.
- अशा मुलांना अधिक काळपर्यंत शारीरिक तसेच मानसिक विकासासंदर्भात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय मेंदूशी संबंधित काही तक्रारी
- निर्माण होण्याचीही शक्यता असते. त्यामध्ये शारीरिक विकास तसेच शिकण्याची क्षमता कमी असणे, स्वतःकडे पुरेसे लक्ष दिले न जाणे अशा समस्यांचा समावेश होतो.
- या शिवाय अशा मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी, स्पायनल कॉर्ड, ऑटिज्म याही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. लवकर जन्मलेल्या मुलांमध्ये श्वसनासंदर्भातील तसेच आतडय़ांच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
- अशा मुलांमध्ये अन्य सामान्य मुलांच्या मानाने डोळ्याशी संदर्भातील तक्रारी अधिक आढळतात. या शिवाय या मुलांमध्ये अन्य सामान्य मुलांच्या तुलनेत ऐकण्याची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. त्याच बरोबर दातांचा रंग बदलणे, येणारे दात तुटलेले किंवा दुसरीकडे आलेले असणे अशीही लक्षणे दिसून येतात.
- वेळेपूर्वी जन्माला आलेल्या मुलांमध्ये न्यूमोनिया, मेनिनजायटीस आदी प्रकारचे इन्फेक्शन होण्याची शक्यताही अधिक असते.
- ही सारी लक्षणे पाहिली असता मूल वेळेपूर्वी जन्माला येणे किती चिंताजनक ठरते याची कल्पना येते. त्यामुळे मूल अशा प्रकारे जन्माला येऊ नये याबाबत योग्य ती काळजी घेतली जायला हवी. त्यासाठी आधुनिक उपचारांचा आधार घेता येईल.









