दूरसंचार विभागाची माहिती – ओटीपी सेवा लागू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
वृत्तसंस्था/ मुंबई
येणाऱया काळात लवकरच मोबाईल ग्राहकांसाठी आपल्या प्रीपेड सिम कार्डला पोस्टपेडमध्ये किंवा पोस्टपेड सिमला प्रीपेडमध्ये बदलण्यासाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) ची सेवा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात दूरसंचार विभागाकडून काम सुरु असल्यामुळे लवकरच यावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार मोबाईल फोन ग्राहकांना लवकरच एका ओटीपीच्या मदतीने ऑथेंटिकेशनचा वापर करुन प्रीपेड आणि पोस्टपेड सेवा बदलण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. या उद्योगातील बॉडी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) यांनी दूरसंचार विभागाला (डीओटी) या संबंधीचा प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात विभागाने दूरसंचार ऑपरेटर्सकडून संकल्पनेच्या पुराव्यासंबंधी (पीओसी- प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट) चे काम हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व क्षेत्रात ओटीपीचा स्विकार
ओटीपीच्या आधारे ऑथेंटिकेशन (प्रमाणीकरण) सध्याच्या कालावधीत सर्व क्षेत्रांमध्ये स्विकारले जात आहे. नागरिकांच्या संबंधीत असणाऱया सेवांमध्ये ओटीपीचा वापर होत आहे.
अंतिम निर्णय पीओसीवर
दूरसंचार विभागानुसार बदलाची मान्यता ही पीओसीच्या ठोस पुराव्यानंतरच निश्चित होणार आहे. प्रीपेडमधून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदल करण्यासाठी पीओसी प्रक्रिया दूरसंचार सेवा देणाऱया कंपन्या करणार आहेत. डीओटीचे अतिरिक्त महासंचालक सुरेश कुमार यांनी, या संपूर्ण प्रक्रियेसंबंधीचा अंतिम निर्णय हा पीओसीच्या कामात कितपत यश मिळतं यानुसार घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे.









