वार्ताहर/ पट्टणकुडी
सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये 93 टक्के गुण मिळवून एमबीबी एससाठी निवड झालेल्या प्रियांका अक्कोळे हिचा येथील शम्स स्पोर्टस्च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अझहर नाईकवाडे, इम्रान मुल्ला, किरण गौराई, सुनील चंदूगडे, राजू मुल्ला, अफजल मुल्ला, सोहेल जमाल, मोहसीन मुल्ला, अभिजित गौराई, असिफ कमते व मान्यवर उपस्थित होते. नीट परीक्षेतून 93 टक्के गुणाने उत्तीर्ण होऊन शासकीय कोटय़ातून एमबीबीएसच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेली ती गावातील पहिलीच विद्यार्थिनी असल्याने तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









