प्रियांका चोप्रा आता बहुतांश वेळ विदेशात राहत असली तरीही ती स्वतःचे मूळ विसरलेली नाही. प्रियांका अनेकदा मंगळसूत्र घालून दिसते. निक जोनस सोबत विवाहानंतर पहिल्यांदा जेव्हा मंगळसूत्र घातले तेव्हा कसे वाटले होते हे तिने आता सांगितले आहे.

प्रियांकाने अलिकडेच मॉडर्न मंगळसूत्र लाँच केले आहे. यावेळी तिने मंगळसूत्राची महत्त्व आणि स्वतःचे अनुभव मांडले आहेत पहिल्यांदा मंगळसूत्र घातलेला क्षण माझ्या लक्षात आहे. याचे महत्त्व काय आहे याच विचारांसह आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. हा माझ्यासाठी अत्यंत विशेष क्षण होता. परंतु एक आधुनिक महिला असल्याने याचे महत्त्व देखील मी समजत होते. पसंत असलेल्या परंपरांचे पालन करणे योग्यच असते. बहुधा आम्ही आमच्या पुढील पिढय़ांमधील मुलींना खूपच वेगळय़ा प्रकारे पाहू असे प्रियांका म्हणाली.
प्रियांका आणि निक यांचा विवाह 2018 मध्ये भारतात झाला होता. प्रियांका दीर्घकाळानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. फरहान अख्तरचा चित्रपट ‘जी ले जरा’मधून ती बॉलिवूडमध्ये परतत आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसून येणार आहे.









