पत्नीच्या चित्रपटात दिसणार निक जोनस
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा चित्रपट ‘लव्ह अगेन’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या ट्रेलरला जगभरात पसंती मिळत आहे. या चित्रपटात प्रियांकाचा वेगळा अवतार दिसून येणार आहे. हा चित्रपट 12 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. ‘लव्ह अगेन’मध्ये प्रियांका चोप्रा हिच्यासह सॅम ह्यूगन आणि सेलीन डायोन हे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत.

या चित्रपटात प्रियांकाच्या चाहत्यांनी निक जोनसची झलक देखील दिसून येणार आहे. निक जोनस या चित्रपटात अतिथी कलाकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. प्रियांकान हॉलिवूडमध्ये सर्वात मोठी आशियाई कलाकार म्हणून स्थान मिळविले आहे. हा चित्रपट आम्ही अवघड काळात तयार केला आहे. बहुतांश लोक जेव्हा स्वतःच्या प्रियजनांपासून दूर होते, तेव्हा आम्ही सेटवर एकत्र होतो. हा अत्यंत विशेष क्षण राहिला आहे. सेलीन डायोन आणि माझा सह-कलाकार सॅम ह्यूगन, रसेल टोव्ही, सोफिया बार्कले यांच्यासोबत काम करणे आनंददायी अनुभव होता असे प्रियांकाने नमूद केले आहे.
‘लव्ह अगेन’ची पटकथा जेम्स सी स्ट्रॉस यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच पेलली आहे. चित्रपटात प्रियांका ही मीरा तर ह्यूगन हा रॉबच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे. या चित्रपटात रसेल टोवी, स्टीव्ह ओरम, ओमिड जेलिली, सोफिया बार्कले, लिडिया वेस्ट, अरिंज केने आणि सेलिया इमरी हे कलाकार दिसून येणार आहेत.









