राज्याच्या जनतेकडून परिवर्तनाचा निश्चय
उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत सर्व 403 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केल्यारव काँग्रेसने स्वतःचे बळ वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. राज्यात आता चौथ्या टप्यातील मतदानाकरता प्रचार सुरू आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वड्रा यांनी सोमवारी लखनौमध्ये रोड शो केला आहे. लखनौच्या सर्व 9 मतदारसंघांना व्यापण्याकरता त्यांनी 171 किलोमीटर इतक्या अंतराचा रोड शो आयोजित केला होता.
राज्यातील जनता परिवर्तन इच्छित आहे. भाजप सरकारच्या काळात जनता अत्यंत त्रस्त आहे. लोकांसमोर महागाई आणि बेरोजगारीच्या समस्येवर संकट उभे ठाकले आहे. काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी मजबुतीने लढत आहे. नव्या प्रकारचे राजकारण यावे असे जनतेला वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.
पंतप्रधानांनी महागाई, बेरोजगारी आणि भटक्या गुरांबद्दल काहीही बोलणे टाळले आहे. भटक्या प्राण्यांच्या समस्येबद्दल आता कळत असल्याचे ते सांगत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी त्यांना माहिती दिली नव्हती का? शासकीय पदे रिक्त असताना बेरोजगारी का आहे असे म्हणत प्रियंका यांनी छत्तीसगडमध्ये भटक्या प्राण्यांची समस्या सोडविण्यात आल्याचा दावा केला आहे.









