ऑनलाईन टीम / लखनौ
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज ललितपूर दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी खतासाठी रांगेत उभे असताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना भेट देत कुटुंबीयांचे विचारपुस केले. मृत्यू होण्यापुर्वी हा शेतकरी खतासाठी रांगेत उभारत होता. खताच्या कमतरतेमुळे बल्लू पाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. असल्याचं गांधी यांनी स्पष्ट केले. प्रियंका गांधी यांनी नायगाव आणि माळवाडा खुर्द येथील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. माळवाडा खुर्द येथील सोनी अहिरवार या शेतकऱ्याने ३-४ दिवस रांगेत उभे राहूनही खत न मिळाल्याने तणाव आल्याने गळफास लावून घेतला. उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या पार्श्वभुमीवर वेगवेगळ्या मुद्यांना उचलून धरण्यासहीत राज्यातील वेगवेगळ्या भागांचा धावता दौराही प्रियंका गांधी सध्या करताना दिसत आहेत. आपल्या राजकीय कार्यक्रमांदरम्यान वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्तींशी संवाद साधण्याचा त्या आवर्जुन प्रयत्न करत आहेत.
या दौऱ्यादरम्यान गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित शेतकरी कुटुंबांची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बुंदेलखंडमधील शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. खतासाठी लांबच लांब रांगा आहेत. खताची चोरी होत असल्याने शेतकरी नाराज आहेत, शेतकऱ्यांना १२०० रुपये किमतीचे खत २००० रुपयांना विकत घ्यावे लागत आहे, असं त्या म्हणाल्या.
भाजपाच्या राजवटीत शेतकरी त्रस्त आहेत.अधिकाऱ्यांकडून खतांचा काळाबाजार होत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले असून ही व्यवस्था त्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, या घोषणेचा पुर्नउच्चार प्रियंका गांधी यांनी केला. यामुळे गांधी यांच्या आरोपानंतर विरोधी पक्षनेता म्हणुन भाजप यावर काय भुमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.