प्रतिनिधी/ पणजी
मिरामार येथील धेंपे कला व विज्ञान महाविद्यालयातील बायोटेक्नॉलॉजी शाखेच्या साहाय्यक प्राध्यापक प्रिती पौडवाल यांना बायोटेक्नॉलॉजी (मरीन व्हायरसीस) या विषयात सादर केलेल्या प्रबंधासाठी डॉक्टरेट प्राप्त झाली आहे.
याच वर्षी जुलै महिन्यात त्यांनी पीएडी पूर्ण केली. त्यांचा प्रबंध प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. त्यावरून क्रोएशियामध्ये झालेल्या व्हायरोलॉजी परिषदेसाठी भारताच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली होती.









