बेळगाव : विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विविध संशोधन प्रकल्पाला प्रोत्साहन म्हणून दिला जाणारा यंदाचा पुरस्कार केएलई कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुनिल जलालपुरे यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
व्हिजन गुप ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी ही राज्य सरकारची संस्था विज्ञान उच्च शिक्षण, संशोधन आणि विकास यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देते. प्रा. जलालपुरे हे 22 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात असून 118 हून अधिक शोध निबंध प्रकाशीत केले आहेत. त्यांनी 80 शोध निबंध सादर केले आहेत. युजीसी, एआयसीटीई, डीएसटी व आयसीएमआर यांच्याकडून संशोधनासाठी त्यांना 1 कोटी निधी मिळाला आहे.
त्यांच्या यशाबद्दल केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









