कोल्हापूर/प्रतिनिधी
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी सोमवारी दि. 17 रोजी निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर अकरा जानेवारीपासून येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. उपचार सुरु असताना आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ.अशोक भूपाळी यांनी सांगितले. दरम्यान, प्रा.एन.डी. पाटील यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. विचारेमाळ इथल्या शाहू कॉलेज च्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेण्यात आले आहे. कोविड निर्बंध पाळत लोकांना अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.









