पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक नुकसानीत : निफ्टी 10,302.10 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी शेअर बाजारात प्रारंभीच्या काळात निर्माण झालेली तेजी अंतिम क्षणी गमावली गेली आहे. त्यामुळे सेन्सेक्सची घसरणच पहावयास मिळाली. मंगळवारी पतंप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला सायंकाळी चार वाजता संबोधित करणार होते. परंतु या भाषणापूर्वीच सेन्सेक्स लाभ गमावत 46 अंकांची घसरण नोंदवत बंद झाला.
मुंबई शेअर बाजारातील मुख्य समभागांच्या कामगिरीने सेन्सेक्स दिवसभरात 272.39 अंकांनी वधारला होता. मात्र दिवसअखेर सेन्सेक्स 45.72 अंकानी घसरुन निर्देशांक 34,915.80 वर बंद झाला दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 10.30 अंकानी घसरुन निर्देशांक 10,302.10 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक म्हणजे दोन टक्क्मयांनी घरसले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, आयटीसी, ओएनजीसी, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभागही नुकसानीत राहिले आहेत. मात्र मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.
पतंप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी अनलॉक दोन आणि भारत चीन सीमा संघर्ष व अन्य क्यापारासह अन्य गोष्टीवर बोलणार असल्याचे संकेत व्यक्त करत दिवशअखेर गुंतवणूकदारांनी सावध पावित्रा घेतल्याने समभाग विक्रीमुळे शेअर बाजार घसरला आहे. दुसऱया बाजूला कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱया नकारात्मक परिणामांच्या भीतीने गुंतवणूकदारांध्ये काळजीचे वातावरण राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
अन्य बाजारांमध्ये आशियातील चीन, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियातील शेअरबाजार तेजीसह बंद झाले आहेत. जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या भीतीतून हळूहळू बाहेर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याचा परिणाम भारतीय शेअरबाजारांवर होण्याची शक्यताहीं बळावली आहे, असे तज्ञांचे मत आहे.








