अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अद्याप सिंगल
स्वतःचा आदर्श जोडीदार कसा असावा याबद्दल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने स्वतःचे मन मोकळे पेले आहे. मी अद्याप सिंगल असल्याचे सांगत तिने स्वतःच्या स्वप्नांमधील राजकुमार कसा आहे याचे वर्णन एका कार्यक्रमात केले आहे. प्रामाणिक, अधिक उंचीचा आणि स्वच्छ मन असलेल्या व्यक्तीचा शोधात असल्याचे तिने म्हटले आहे.

मी माझी सर्व कमाई स्वतःच्या पालकांच्या हाती सुपूर्द करते. माझे आईवडिल माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत असे सोनाक्षी म्हणाली. अलिकडेच एका मुलाखतीत सोनाक्षीने शाळेत असताना एका मुलाच्या प्रेमात पडल्याचे सांगितले होते.
काकूडामध्ये दिसणार सोनाक्षी सलमान खानसोबत दबंग हा चित्रपट करत सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर राउडी राठौर, दबंग 2, लुटेरा, बुलेट राजा, हॉलिडे, तेवर, अकीरा, कलंक, खानदानी, शफाखाना, दबंग 3, मिशन मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये ती दिसून आली आहे. अलिकडेच सोनाक्षी ‘भुज ः द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तर लवकरच ती ‘काकूडा’ चित्रपटात दिसून येणार आहे.









