वार्ताहर / बुधगाव
छोटी ध्येय बाळगण्यापेक्षा उच्च ध्येय ठेवा यासाठी प्रामाणिक कष्ट व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास निश्चित यश मिळेल असे विचार पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी बिसूर येथे व्यक्त केले.
बिसूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस व प्रशासनातील नोकरीच्या संधी या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पिंगळे म्हणाले, आयुष्यात गुणवत्ता साध्य करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती कधीही अडचण ठरत नाही. पौगंडावस्थेत तरुणांना आपले मन भरकटून न देता ध्येय निश्चित करावे व त्याचा आत्तापासूनच पाठलाग करून आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
यावेळी सरपंच लिलावती पाटील, पोलीस पाटील, सतीश पाटील, अक्षय पाटील, धोंडीराम पाटील, टी. डी. पाटील, सर्व युवक, ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, वरद पाटील, विठ्ठल मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कुलदीप पाटील यांनी करून दिला. संयोजन प्रताप पाटील, संजय पाटील, मोहन पाटील, किशोर साळुंखे, दीपक साळुंखे, चंद्रकांत घारगे, विजय पाटील, रणजीत पाटील, विजय घारगे, अनिल पाटील, संदीप सुरवसे, अभिजीत पाटील व सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी केले.








