वाठार किरोली / वार्ताहर :
रहिमतपूर नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “माझी वसुंधरा” मोहिमेंतर्गत करण्यात येत असलेल्या स्वच्छता, वृक्षारोपन आणि वृक्षसंगोपनासाठी ट्री गार्ड आदी उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेसाठी नगरपालिकेच्या मागणीवरुन प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने 50 हजार रुपयांच्या जाहिरात निधीचा धनादेश नगराध्यक्ष आनंदा कोरे व मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना शिक्षक नेते सिध्देश्वर पुस्तके यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी रहिमतपूर नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मोहनराव निकम,माजी संचालक जनार्दन माने, सेवानिवृत्त संघटनेचे सचिव जगन्नाथ भोसले, मधुकर कदम, सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे तज्ञ सदस्य रुपेश जाधव, प्रविण घाडगे, दादा थोरात, राजेंद्र देशमाने, बाळकृष्ण पवार, रियाज शेख आदी उपस्थित होते.









