प्रतिनिधी / सांगली
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ जितेंद्र डूडी यांना ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोव्हिड रुग्णांना प्राथमिक उपचार व आयसोलेशन कक्ष तसेच ऑक्सिजन व्हेटींलेटर मशीन लवकरात लवकर बसवावेत व त्या-त्या ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच प्रथम उपचार मिळावा जेणेकरून सांगली सारख्या ठिकाणी पेशंटची संख्या कमी व्हावी व गर्दी कमी होईल असे निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दीपक माने, विश्वजीत पाटील ,कृष्णा राठोड, चेतन माडगूळकर, महेश सागरे आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleमुंबईत जाणवले भूकंपाचे धक्के
Next Article सांगली : कार्वेच्या तलाठ्यांचे कोरोनामुळे निधन








