औंध / प्रतिनिधी
अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जाणारा खटाव तालुका हा बुध्दीवंताची खाण आहे. प्रतिकूल परिस्थितीतही परिश्रमाने यशाच्या शिखरावर पोहचता येते हे प्राजक्ता पानस्कर हिने सिध्द केले आहे. एम्स सारख्या आयुर्विज्ञान संस्थेततीची निवड झाल्याने खटाव तालुक्याची मान दिल्लीच्या तख्तावर उंचावली आहे. असे गौरवोद्गार हरणाई सुतगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी काढले.
सुर्याचीवाडी ता. खटाव गावची कन्या प्राजक्ता दत्तात्रय पानस्कर हिने पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स ) च्या नर्सिंग ऑफिसर पदाला गवसणी घातली आहे. 98.45 टक्के गुण मिळवुन देशात 1514 वी रँक मिळवल्याबद्दलतीचा हरणाई सहकारी सूत गिरणीचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेक रावत, माजी सरपंच दत्ता कदम, रामभाऊ घोलप, संजय घाडगे, दत्तात्रय पानस्कर, जनरल मॅनेजर रमेश भोसले, सयाजी सुर्वे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









