वृत्तसंस्था/ प्राग्वे
येथे 26 ते 28 मे दरम्यान महिला व पुरुषांसाठी टेनिस स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकमधील पेत्र क्विटोवहा, तसेच प्लिस्कोव्हा भगिनीसह सुमारे 100 महिला टेनिसपटू सहभागी होत आहेत.
दोनवेळा विंबल्डन जेतेपद मिळविणारी पेत्रा क्विटोव्हा तसेच प्लिसकोव्हा भगिनी, कॅरोलिना मुचोव्हा, बार्बोव्हा स्ट्रायकोव्हा या स्पर्धेत भाग घेणार असल्याची माहिती झेक टेनिस संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. झेक प्रजासत्ताकमध्ये आतापर्यंत कोरोना महामारीत सुमारे 270 जणांचा बळी पडला असून सुमारे 8000 लोकांना याची लागण झाली आहे. या स्पर्धेतून मिळणारे उत्पन्न कोरोनाबाधितांसाठी उपयोगात आणला जाणार आहे. पुरुष विभागातील स्पर्धेत पुण्यातील इंडिया ओपन स्पर्धा जिंकणारा जिरी व्हॅसेलीचा समावेश आहे.









