कामकाजात सुधारणा करा,अन्यथा तीव्र आंदोलन करू वकिलांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रांताधिकारी कार्यालयात कोणतेही काम वेळेत केले जात नाही. शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाल्यानंतर तेथील कर्मचारी, वकिलांना बोलावू नका असे सांगून परस्पर शेतकऱयांची नुकसान भरपाई देत आहेत. तसेच वकिलांना त्या कार्यालयात आदर दिला जात नाही. त्यामुळे वकिलांनी प्रांताधिकारी न्यायालयातून कामबंद करून निषेध नोंदविला.
प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून कामात सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी बार असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी आर. सी. पाटील. माजी अध्यक्ष ऍड. एस. एस. किवडसण्णावर, ऍड. प्रभू येत्नट्टी, ऍड. मोहन माविनकट्टी, ऍड. सचिन शिवण्णावर यांच्यासह वकिल मोठय़ासंख्येने उपस्थित होते.









