शिराळा/प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शिराळा तालुक्यात ‘ खिळे व जाहिरात मुक्त वृक्ष संवर्धन” सुरू केली आहे. तहसील कार्यालय शिराळा येथून या मोहिमेचा प्रारंभ झाला.पर्यावरण संवर्धनासाठी ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे.सुरूवातीला शिराळा तालुक्यातील सर्व झाडे खिळे मुक्त करण्यात येणार आहेत.
शिराळा तालुक्यात पर्यावरण आणि पर्यटन या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासन यांचे प्रयत्न सुरू असतानाच युवकांनी देखील हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे.
‘खिळे व जाहिरात मुक्त वृक्ष संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे.रस्त्याच्या दुतर्फा जाहिरातीचे फलक लावण्यासाठी झाडात खिळे ठोकले जातात. अशी झाडे खिळे मुक्त करण्यात येत आहेत. या मोहीमेला शिराळ्यातून करण्यात आली आहे.








