प्रसिध्द कलाकारांच्या उपस्थितत खेरवसे येथे हिंदी वेबसिरिजचे चित्रीकरण
प्रतिनिधी / लांजा
कोकणातील निसर्ग सौन्दर्याने चित्रपटसृष्टीला भुरळ घातली असून मराठी, हिंदी कलाकार, निर्माते चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी कोकण भागात दाखल होत आहेत.यामध्ये लांजा तालुक्यातील खेरवसे येथील रामानंद या बंगल्यात “शॅडो गेम” या हिंदी वेब सिरीजचे गेली चार दिवस चित्रिकारण सुरू आहे.
त्यानिमित्ताने मराठी मालिकांचे प्रसिद्ध कलाकार खेरवसे येथे दाखल झाले होते. संग्राम समेळ व जुई गडकरी, एकनाथ गिते, वैभव आंबेकर, ललित या प्रसिद्ध कलाकारांसह स्थानिक कालाकार खेरवसे येथील प्रवीण कांबळे, सोहेब पटेल, पूजा गोरुले यांनीही आपला या वेब सिरीजध्ये अभिनय साकारला आहे. कलाकारांनी खेरवसे परिसरातील निसर्गाचे कौतुक केले. येथील निसर्ग प्रदूषण विरहित असून यापुढेही लांजा तालुक्यातील निसर्गाच्या सानीध्यात काम करण्यास कलाकारांनी पसंती दिली.









