पुणे / प्रतिनिधी
व्हायोलिनने गाणारे’ म्हणून ओळख असणारे प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग (Prabhakar Jog) यांचं आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते.
प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन (Violine) वादनातून शब्द ऐकू येण्याचा भास व्हायचा, त्यामुळे त्यांची व्हायोलिने गाणारे व्हायोलिनवादक म्हणून रसिकांमध्ये ओळख होती. त्यांनी गाणारे व्हायोलिने या नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले होते.संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून अत्यंत अल्प मानधनावर आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात करुन केली नंतर संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. प्रभाकर जोग यांनी‘गीतरामायणा’तील गाण्यांना व्हायोलिनचे सूर दिले आहेत. गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.
Previous Articleपरमबीर सिंग बेल्जियममध्ये; संजय निरुपम यांचा दावा
Next Article शासननिर्णय बदलला नाही तर सरकारला गुडघे टेकायला लाऊ








