कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील मराठा लाईट इन्फंट्री कॅम्पमध्ये लष्करी प्रशिक्षण घेणारा एक जवान बेपत्ता झाला आहे. यासंबंधी शनिवारी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
एच. उर्लपु मणिकंठ (वय 20, रा. तेक्कळी, जि. श्रीकाकुळम, आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव आहे. सध्या टीआरजी बीएन ई-काय एमएलआयआरसी कॅम्प येथे त्याचे प्रशिक्षण सुरु होते. शुक्रवारी 22 मे रोजी पहाटे 5.30 वाजता कोणालाही न सांगता तो कॅम्पमधून निघून गेला आहे.
या संबंधी हवालदार शिवाजी भागोजी देसाई यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 171 से.मी.उंची, गहू वर्ण, लांब चेहरा असे त्याचे वर्णन आहे. लष्करी कॅम्पमधून बाहेर पडताना त्या जवानाने पॅन्ट व शर्ट परिधान केला होता. तो तेलगु व हिंदी बोलतो. या जवाना विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405234 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









