ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानी हवाई दलाचे विमान प्रशिक्षण मोहिमेदरम्यान पिंडीघेबमध्ये कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानातील वैमानिकाने स्वतःला सुखरूप बाहेर काढले आहे. पाकिस्तानी मीडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पाकिस्तानी मीडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान पिंडीघेबमध्ये हवाई दलाचे एक विमान कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वैमानिकाने स्वतःला सुखरूप बाहेर काढले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक बोर्ड स्थापन करण्यात आला असून, या घटनेची चौकशी केली जाईल. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पाकिस्तानातीलअशा प्रकारची ही पाचवी घटना आहे.
जानेवारी महिन्यात मियानवालीजवळ एका प्रशिक्षण मोहिमेदरम्यान पीएएफचे विमान कोसळले होते. त्या दुर्घटनेत दोन्ही वैमानिक ठार झाले. खैबर पख्तुनख्वा जिल्ह्यातील तख्त भाईजवळ 12 फेब्रुवारी रोजी पीएएफ प्रशिक्षकाचे विमान कोसळले. दोन महिन्यांत नियमित प्रशिक्षण मोहिमेवर कोसळलेले हे तिसरे पीएएफ प्रशिक्षण विमान होते. त्याच महिन्यात नियमित ऑपरेशनल ट्रेनिंग मोहिमेवर असलेले पीएएफ मिराज विमान लाहोर-मुलतान मोटरवेजवळ कोसळले.
मार्च महिन्यातही परेडच्या सरावादरम्यान पीएएफचे एफ-16 विमान इस्लामाबादमधील शक्केरियनजवळ कोसळले. या अपघातात एका विंग कमांडरचा मृत्यू झाला होता.