पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि सर्वात खोल म्हणून प्रशांत महासागर ओळखला जात आहे. या महासागराच्या पोटात 5 हजार फूट खोलीवर दुर्मीळ धातूंचा मोठा साठा असल्याचा दावा संशोधकांकडून केला जात आहे. हे दुर्मीळ धातू सध्याच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी अत्यावश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.
या धातूंमध्ये प्लुटोनियम-244 या दुर्मीळ धातूचे प्रमाण मोठे असल्याचे सांगितले जाते. हा धातू कोटय़वधी वर्षांपूर्वी अंतराळात झालेल्या विस्फोटक घटनांमधून निर्माण झाल्याचे अनुमान आहे. या धातूचे हाफलाईफ 8 कोटी वर्षांपेक्षा जास्त आहे. या शोधामुळे पृथ्वीवर विविध धातू कसे निर्माण झाले? या प्रश्नाचे थोडय़ाफार प्रमाणात तरी उत्तर मिळण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अणुविज्ञान आणि तंत्रज्ञान संघटनेच्या मतानुसार अंतराळात हे स्फोट 450 कोटी वर्षांपूर्वी घडले असावेत. याच विस्फोटातून आपली सूर्यमाला तयार झाली आहे. म्हणजेच हे दुर्मीळ धातू सूर्यमालेइतक्मयाच वयाचे आहेत. दोन न्युट्रॉन ताऱयांच्या विलय प्रक्रियेतून पृथ्वीवर जी साधनसामग्री येऊन पडली; त्यातूनच हे जड दुर्मीळ धातू तयार झाले, असे मानले जाते. प्रशांत महासागराच्या पोटातून हे दुर्मीळ धातू कसे काढता येतील, याबद्दल आता विचार सुरू झाला असून अनेक देशांमध्ये यासाठी स्पर्धाही होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.









