संजद नेते प्रशांत किशोर यांनी ट्विट करत गृहमंत्री अमित शाह यांना नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसी लागू करून दाखविण्याचे आव्हान दिले आहे. नागरिकांची असहमती फेटाळणे कार्यक्षम सरकारच्या बळाचा संकेत नाही. शाह यांनी सीएए आणि एनआरसी एकाचवेळी लागू करून दाखवावे, असे ते म्हणाले.









