ऑनलाईन टीम / टोकियो :
एलिमिनेशन राऊंडमध्ये 32 जणांच्या फेरीत सातारच्या प्रवीण जाधवने जागतिक कमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियाच्या गॅल्सन बझारझपोव्हला पराभूत करत 16 जणांच्या फेरीत प्रवेश केला. मात्र, तिथे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या अमेरिकेच्या ब्रॅडी ऍलिसनने एलिमिनेशन राऊंडमध्ये प्रवीणला 6-0 च्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे सातारच्या प्रवीण जाधवचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.









