पाणी समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱयांची घेणार बैठक
पेडणे / प्रतिनिधी
गेले अनेक वर्ष पेडणे तालुक्मयात आणि पर्यायाने मतदारसंघात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्याने तालुक्मयातील नागरिक हैराण झाले आहेत. दै. तरुण भारतने यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध करून स्थानिक आमदाराने पाणी प्रकल्पाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार प्रवीण आर्लेकर यांनी शुक्रवारी होळीच्या दिवशी दुपारी 1.30 वाजता चांदेल प्राणी प्रकल्पाला अचानक भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. आपण यासंबंधी लवकरच संबंधित ठेकेदार आणि खात्याचे अधिकारी तसेच अभियंते यांची बैठक घेणार असल्याची ग्वाही आर्लेकर यांनी दिली.
पेडणे मतदारसंघातील पाणी समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्यक्रमाने लक्ष घालणार असून नवीन उभारण्यात येणारा 15 एमएलडी पाणी प्रकल्प याचे काम गेली अनेक महिने मंदगतीने सुरू असल्याचे पाहणी केल्यावर दृष्टीस पडले. आपण यासंबंधी लवकरच संबंधित ठेकेदार आणि त्या खात्याचे अधिकारी तसेच अभियंते यांच्याशी बैठक घेऊन याबाबत चर्चा करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी सांगितले.
गेली अडीच वर्षे या मतदारसंघात विविध कार्यक्रमातून लोकांच्या घरापर्यंत पोहोचलो त्यावेळी प्रत्येक नागरिकाची समस्या ही पाण्याची होती. ते आपल्या बोलण्यातून ती व्यक्त करत होते. यासाठी आज होळी उत्सवाची सुट्टी होती तरी आपण अगोदर पाणी प्रकल्पाला भेट देऊन याबाबत परिस्थिती काय आहे याची माहिती करून घेतली. आपण कुठल्याही अधिकाऱयाला याबाबत कल्पना न देता या ठिकाणी भेट दिल्याचे आर्लेकर यांनी यावेळी सांगितले.
तालुक्मयातील सरकारी कार्यालयांनाही देणार भेट
पेडणे तालुक्मयातील सरकारी कार्यालयात आपण अशाच प्रकारे अचानक भेटी देऊन ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे कर्मचारी काम चुकारपणा करतात तसेच नागरिकांना त्यांच्या कामासाठी हेलपाटे घालायला लावतात अशा अधिकाऱयांना तसेच कर्मचाऱयांची गय केली जाणार नाही. पेडणेतील जनतेची कामे कर्मचाऱयांनी वेळेत करावी नपेक्षा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रवीण आर्लेकर म्हणाले.









