वार्ताहर / कबनूर
कबनूर येथील ग्रामपंचायत कडील कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत गुरुवारी 18 पासून कामगार काम बंद आंदोलन सुरू केले दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांच्या बैठकीतील सरपंच याने मांडलेला प्रस्ताव संघटनेने अमान्य करून दालनातून बाहेर पडले. कबनूर तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत यापूर्वी लेखी निवेदन दिले होते. आपल्या प्रलंबित मागण्याबाबतही नुकतीच श्रमिक कामगार संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. कामगारांचा दोन महिन्याचा पगार थकित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी नुकतेच काम बंद आंदोलन केले होते.
त्यावेळी मागील एक वर्षापैकी केवळ दोन महिन्याचे प्रॉव्हिडंट फंड जमा केले आहे .गेल्या सहा वर्षापासून काही कामगारांचा खात्यावर फंड भरलेला नाहीनाही. सेवा पुस्तके भरलेली नाहीत. तेव्हा या मागण्यांकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारपासून सर्व कामगार नाईलाजास्तव काम बंद आंदोलनावर जात आहेत असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
गुरुवार तारीख 18 पासून ग्रामपंचायत कडील कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्याबाबत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली .आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा चालू होत्या. दरम्यान आज ग्रामपंचायत मधील सभाग्रहात ग्रामपंचायत पदाधिकारी व कामगार नेते आप्पा पाटील व कामगार प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली या बैठकीत आप्पा पाटील यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत सरपंच यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी सरपंच सुनील स्वामी यांनी येत्या 15 पर्यंत कामगारांचा पगार देण्याची व्यवस्था करून तसे पत्रही आपणास देण्यात येईल असे सांगितले होते.
परंतु कामगार प्रतिनिधी सर्व कामगारांनी सरपंचांनी ठेवलेला प्रस्ताव अमान्य करून दालनातून कामगार नेते आप्पा पाटील कामगार उठून बाहेर आले त्यानंतर त्यांनी आपला काम बंद आंदोलन असेच सुरू ठेवले बैठकीवेळी सरपंच सुनील स्वामी सदस्य कुमार कांबळे अभिजीत खरे निलेश पाटील जय कुमार केटकाळे तर कामगार प्रतिनिधी म्हणून कॉम्रेड आप्पा पाटील अध्यक्ष सुकुमार कांबळे औदुंबर साठे अनुसया कांबळे मंगल हेगडे सविता महाजन उत्तम गेजगे यांच्यासह कामगार उपस्थित होते.








